नवरात्रोत्सवात दांडिया चालु असताना तरुणाचा ह्रदयविकाराने मृत्यु, तर ते पाहून वडिलांचाही ह्रदयविकाराने मृत्यु

विरार, ३ ऑक्टोबर २०२२: विरार येथे ग्लोबल सिटी येथील एका ईमारतीमध्ये नवरात्रोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान दांडिया खेळत असताना मनीष जैन वय वर्ष पस्तीस या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आला.

हे पाहून मनीषचे वडिल आणि भाऊ यांनी ताबडतोप त्याला घेउन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतू रुग्णालयात पोहचण्या आगोदरच रिक्षामध्ये मनीषचा मृत्यु झाला. आपल्या मुलाचा मृत्यु पाहून वडिलांचाही ह्रदयविकाराने जागीच मृत्यु झाला.

या घटनेनंतर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आचानक मृत्युची नोंद करण्यात आली आहे‌. मयत मनीष जैन यांचे तीन महिन्याआगोदरच लग्न झाल्याचे सांगण्यात आले आहे आणि जैन कुटुंबीयांचे सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी जैन कुटुंबीयांबद्दल हळहळ व्यक्त केली. हे कुटुंब खुप मनमिळावू होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा