उत्तरप्रदेश, ४ ऑक्टोबर २०२२: उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये भीषण अपघात झाला आहे. अतीवेगाने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा टायर फुटून चालकाचं नियंत्रन सुटलं आणि दुभाजकावर आदळली व त्यानंतर ती कार पलटी होउन समोर असलेल्या बुलडोझरला धडक दिली आहे.
कोरीया गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत दखील कैद झाली आहे. शाहजहापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले कमलेश कुमार हरदोई हे बँक ऑफ इंडियाच्या एलडीएम शाखेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते शहाजहापूरहून हरदोईला जात असताना कोरीया गावाजवळ अल्टो कारचा पुढचा टायर फुटला आणि त्यामुळे कमलेश कुमार याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बुलडोझरला धडकली.
कारचा वेग ईतका होता की अपघातानंतर कारचं मोठ नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कारमध्ये अडकलेल्या कमलेशला कार कटरनं कापून बाहेर काढण्यात आलं. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखलकरण्या आधीच कमलेशचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर