खोकल्याच्या औषधाने आफ्रीकेत ६६ मुले दगावली; भारतीय कंपनीची चौकशी सुरु

आफ्रिका, ६ ऑक्टोबर २०२२: एक धक्कादायक घटना समोर आलीय. भारतीय कंपनीचे खोकल्याचे औषध पिऊन आफ्रिकेतील गांबिया शहरात ६६ बालकांचा मृत्यु झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या कंपणीच्या चार औषधांबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील Central Drugs Standard Control Organisation ने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून यावर पुढील तपास सुरु आहे. हरियाणातील Maiden Pharmaceuticals Limited या कंपणीने बनवलेली औषधे सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Promethazine Oral Solution, Kofexmalin Baby Cough Syrup, Makoff Baby Cough syrup आणि Magrip N Cold Syrup चार खोकल्याची औषधे ही लहान मुलांच्या आजारात वापरली जातात. ही औषधे भेसळयुक्त आहेत, तसेच त्यात असणारी काही रसायने ही जीवघेणी ठरु शकतात.

असा संशय जागतिक आरोग्य संघटनेला आहे. गांबिया शहरात गेल्या महिन्यापासून ६६ लहान मुलांचा मृत्यु झाला आहे. आणि लहान मुलांच्यात किडनीची समस्या निर्माण होत असल्याचं दिसून आले आहे. त्यानंतर गांबियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रार नोंदवली आहे.

स्थानिक बाजारातील काही खोकल्याची औषधे घेतल्यानंतर काही मुलांच्या प्रकृती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपणीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा