एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओ 5G चा दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

पुणे, ६ ऑक्टोबर २०२२ : एअरटेल पाठोपाठ आता रिलायन्स जिओ कडून भारतात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिओने दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओ 5G सेवा सुरु केली आहे. देशात पहिल्या टप्प्यात फक्त चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येईल. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार प्रमुख शहरांमध्ये ही सेवा चालू करण्यात येणार आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओच्या True 5G सेवेची बीटा चाचणी सुरू करण्यात येत आहे. चालू घडीला या सेवेचा फक्त निवडक युजर्सना वापर करता येणार आहे. आत्ता वापरत असलेल्या जिओ युजर्सपैकी ठराविक ग्राहकांना Jio True 5G सेवा वापरण्यासाठी निमंत्रित केले जाईल. केवळ निमंत्रित ग्राहकांना ही सेवा वापरता येणार आहे.

निमंत्रित युजर्सना एक विशेष योजना देखील देण्यात येणार आहे. ज्यामुळे युजर्सना 1Gbps पर्यंतचा वेग आणि अमर्यादित 5G डेटा मिळणार आहे. निमंत्रित ग्राहकांना Jio True 5G सेवेचा अनुभव घेता येईल. आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारद्वारे कंपनी इतर सर्व ग्राहकांसाठी एकत्रित 5G सेवा सुरू करणार आहे.

Jio True 5G स्वागत योजना पुढील प्रमाणे

Jio True 5G स्वागत योजना मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथील Jio ग्राहकांना निमंत्रण देऊन सुरू केली जाणार आहे.

निमंत्रित ग्राहकांना 1 Gbps पर्यंत स्पीडसह अमर्याद 5G डेटा मिळेल.

निवड केलेल्या चार शहरांनंतर उर्वरित शहरांसाठी बीटा चाचणीची घोषणा करण्यात येणार आहे.

या चारही शहरामधील नेटवर्कचे संपूर्ण जाळे विकसित होईपर्यंत ग्राहकांना बीटा चाचणीचा फायदा घेता येणार आहे.

निमंत्रित केलेल्या ग्राहकांना जिओ स्वागत योजनेमध्ये ग्राहकांना त्यांचे सध्या सुरू असलेले जिओ सिम बदलण्याची गरज नाही. जुने सिमकार्ड आपोआप जिओ मधून 5G सेवेत कन्व्हर्ट होणार आहे. परंतु यासाठी ग्राहकाकडे 5G मोबाईल असणे गरजेचे आहे.

रिलायन्स कडून सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे ही जिओ 5G ची बीटा चाचणी आहे. बीटा चाचणी संपूर्ण देशात जिओ 5G सेवा लाँच होण्यापूर्वीचा एक टप्पा आहे. ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन त्याप्रमाणे 5G नेटवर्कमध्ये दुरुस्ती करण्यात येईल. जिओने सांगितले आहे की कंपनी आपल्या ४.२५ कोटी ग्राहकांना 5G सेवेचा नवीन आणि उत्तम अनुभव देऊ इच्छितो. ज्यामुळे भारतात डिजिटल क्रांती घडून येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा