महिला पोलिस अंमलदारवर आत्याचार करुन केलं ब्लॅकमेल

बीड, ६ ऑक्टोबर २०२२: बीडमधील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिला पोलिस अंमलदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याकडून तब्बल तीन लाख रुपये उकळले, हा प्रकार काल उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडीत महिला दोन वर्षांपासून या परिसरात भाड्याच्या घरात आपल्या आई आणि भावासोबत राहत होती. तीथेच तिची ओळक गल्लीतील विनायक अनिल सवाई याच्याशी झाली असून त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. याच दरम्यान विनायकला पैशांची गरज होती.

म्हणून त्याने महिलेला पैशाची गरज आहे, असे सांगितले. पैसे मी परत देईन असे सांगितले. पीडीत महिलेनी पोलीस पतसंस्थेतून दोन लाख रुपये कर्ज घेऊन त्याला दिले. त्यानंतर अनेकदा वीस हजार दे ५० हजार दे असे करून पैसे काढून घेतले. बरेच महिने झाल्याने महिलेनी पैशांची मागणी केली असता विनायकने तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा आत्याचार केल्याचे पीडीत महिलेने सांगितले आहे.

याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा