उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका

मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२२ : दसऱ्याच्या निमित्तानं शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपा तसेच बंडखोर शिंदे गटाला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरसंघचालक मोहन भागवत, यांची नावे घेत त्यांच्यावर टीका केली.

पण, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर संमिश्र पद्धतीनं उमटताना दिसत आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केली आहे. राणे यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेत राणे म्हणाले, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर टीका केली. थोडी मर्यादा राखली गेली पाहिजे. स्वत: चालू शकत नाहीत. मंत्रालयात येऊ शकत नाहीत मात्र दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरत आहेत, अशी टीका ते करत आहेत. हा माणूस २० मिनिटे चालू शकत नाही. फक्त बढाया मारत आहेत. डॉक्टरांनी वाकायला परवानगी दिलेली नाही, असे ते म्हणत होते. वाकायलाही डॉक्टर लागत असेल तर तू काम काय करणार? अशी टीका नारायण राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांना दुसरे काही येते का? मोठ्या लोकांचे नाव घेऊन आपण टीका केली की, आपल्याला कोणीतरी मोठं म्हणेल असे त्यांना वाटते. म्हणूनच ते जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असतात. उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले. ते अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच तास मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेले एकतरी काम सांगावे, असे आव्हान नारायण राणे यांनी यावेळी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा