मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२: शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही बंदी घातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अशातच आरोप प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्ष चिन्ह गोठवणं हा शिवसेनेवर अन्याय असून ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके’ हे गाणं मला शिंदे गटासाठी आठवते आहे. अशी घटना अगोदरही झाली आहे. आता हे कटकारस्थान उद्धव ठाकरेंसाठी करण्यात आले आहे. मात्र, मला शिंदे गटाची काळजी वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी हे गाणं आठवतं’ असा टोला त्यांनी लगावला.
… असे पक्ष संपत नसतात
पुढे त्या म्हणाल्या, गोष्टींनी पक्ष संपत नसतात, राष्ट्रवादी कॉग्रेस पण २०१९ ला संपली असे म्हटले होते, पण असे पक्ष संपत नसतात. देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे बोलतात ते सगळंच खर नसते. पक्ष बदलल्यावर अस बोलले जाते. राष्ट्रवादीवर आरोप केल जातात. असेही त्या म्हणाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.












































