रत्नागिरी,१० ऑक्टोबर२०२२: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात आले आहे. हे सर्वजण पाचगणी मधील रहिवासी आहेत.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, रविवार असल्यामुळे हे सर्वजण कर्दे समुद्रांत पोहण्यासाठी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाजण पाण्यात बुडाले. ही धक्कादायक घटना स्थानिक नागरिकांनी बघितली असता. मदत करण्यास सूरवात केली, परंतू पाच जणांना वाचवण्यात यश आले.
मात्र एकजण वाहून गेल्यामुळे सापडला नाही. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलीस सर्वानी मिळून शोध घेतला. परंतू अंधार पडल्यामुळे तपासकार्य थांबवण्यात आले. या घटनेत कार्तिक घाडगे, यश घाडगे, दिनेश चव्हाण, अक्षय शेलार, कुणाल घाडगे असे वाचवण्यात आलेल्या मुलांचे नाव आहे.
आज सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु केली असता. सौरभ प्रकाश घावरे याचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळून आला आहे. या घटनेनंतर पाचही मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर