MCA निवडणुकीत शरद पवार विरुद्ध आशिष शेलार सामना

मुंबई, १० ऑक्टोंबर २०२२ : मुंबई क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत रंगतदार लढतीची दाट शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध आशिष शेलार मैदानात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदा माजी क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना रंगणार आहे. तब्बल ११ वर्षानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी अशी लढत होणार आहे. आशिष शेलार यांनी याआधी सुद्धा एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA ची येत्या २० ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी ICC आणि BCCI अध्यक्ष शरद पवार यांचा गट सज्ज झाला असून विविध पदांसाठी या गटाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. पवार गटातर्फे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार असून उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी हे रिंगणात आहेत. सचिव पदासाठी तरुण आणि उच्चशिक्षित अजिंक्य नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सहसचिव पदासाठी गौरव पय्याडे आणि खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर हे निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एक दुर्मिळ योग पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. तर यावेळी शरद पवार आशिष शेलारांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा