मनसेची अनोखी नीती – 6 M … सहा सूत्रे

मुंबई, ११ ऑक्टोबर, २०२२ : मनसे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे हे युद्ध अनाहूतपणे सुरु आहे. पण मनसे शिंदे गटात जाणार का ? या प्रश्नाचे उत्तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देऊन टाकले. मुंबई पालिका निवडणूक एकट्याच्या जीवावर लढण्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे आता अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. त्याचबरोबर आता कार्यकर्त्यांनी कामाला लागा… असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता मनसे मुंबई पालिका एकट्याच्या जीवावर लढणार हे नक्की.

पण ही निवडणूक लढताना त्यांनी एक नवीन प्रणाली जाहीर केली आहे. ती आहे 6 M प्रणाली..
6 M म्हणजे
मेसेज
मेसेंजर
मनी
मसल
मेकॅनिक
माईंड

मेसेज करा, मसेंजरसारख्या माध्यमांचा वापर करा. मनी म्हणजे पैशाचा वापर करु, पैसा उभा करु आणि मेकॅनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि मसल म्हणजे ताकदीचा वापर करु. माईंड म्हणजे मनाचा वापर करा. अशी सहा सूत्रे राज ठाकरे यांनी सांगून नवी रणनीती आखली आहे.
हे सांगताना त्यांनी सांगितलं की दसऱ्यामेळाव्यात कोणतेही विचार पसरले नाही. त्यात केवळ एकमेकांवर चिखल आणि ताशेरे फेकले गेले. त्यामुळे खरे हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत हे विचार पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

मनसे आता पूर्णपणे जोशात असून, त्यांच्या कार्यप्रणालीमुळे जनतेपर्यंत मनसे पोहोचेल… असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे एकट्या जीवावर मनसे किती पुढे जाते, हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल, हे खरं….

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा