विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली. पाटील यांनी याआधीही हे पद भूषवले आहे. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा उत्तम अनुभव आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघडीला शनिवारी बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे.
त्याआधी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या जागी पाटील यांची निवड करण्यात आली. पाटील यांनी २००९ ते २०१४ या काळात विधानसभा अध्यक्षपद भूषवले आहे.

सद्यस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरून खेचाखेची सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या आतापर्यंत ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार होते. परंतु काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद हवं असल्याने त्यावर दोन्ही पक्षांत सध्या चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास दिलीप वळसे पाटील यांचीच या पदासाठी नेमणूक होऊ शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा