पुणे, दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ : पुण्यात सदनिकेचे लॉक तोडून सोन्याचे दागिने, चांदीचे पूजा साहित्य अशा दहा लाख रुपयांचा ऐवजाची चोरी कणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील एका सोसायटीत राहत आहेत. कामानिमित्त सदनिका बंद करुन त्या सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे लॉक तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीचे पूजा साहित्य असा दहा लाख साडेचार हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर










































