OMG ! त्याने फिरवली चक्क डोंगराच्या माथ्यावरून सायकल…

पुणे, १३ ऑक्टोंबर २०२२: इंटरनेटवर एकापेक्षा एक आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही डोळ्यात पाणी आणणारे, काही हसवणारे, काही रोमांचक, तर काही भितीदायक देखील असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे.

तुम्ही पण विचार करत असाल की सायकल चालवण्यात काय आश्चर्य ? तर या व्हिडिओमधील हा माणूस रस्त्यावर नाही तर चक्क डोंगराच्या माथ्यावरून सायकल चालवताना दिसत आहे. ते पाहून काहींना हसू येईल तर काहींना हा खतरनाक व्हिडिओ पाहून भीती वाटेल. ज्या पद्धतीने जीव धोक्यात घालून त्याने केलेला हा स्टंट पाहून काही लोक घाबरले देखील आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यावर ‘खतरों के खिलाडी’ चा एपिसोड पाहात असल्यासारखे वाटेल. कारण कोणत्याही क्षणी हा सायकलस्वार दरीत पडतो की काय? अशी भीती वाटते आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला ‘खतरनाक स्टंटबाजी’ म्हटले आहे तर काहींनी याला ‘साहस’ असे म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावरील ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १.८ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केले. कमेंट सेक्शनमध्ये लोक अनेक मजेदार आणि अनोख्या कमेंट करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा