टीम इंडिया ने थायलंडचा ७४ धावांनी केला पराभव, महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, १४ ऑक्टोबर २०२२ : महिला आशिया कपच्या सेमी फायनल सामन्यांत भारताने थायलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताने हा सामना ७४ धावांनी जिंकला आहे. थायलंडचा संघ १४९ धावांचा पाठलाग करताना २० षटकात ९ विकेट्स गमावत ७४ धावसंख्याच करू शकला. याचबरोबर भारताने सलग आठव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना शेफाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या उत्तम खेळीच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या. टीम इंडिया कडून शेफाली वर्मा ने २८ चेंडू मध्ये ४२ धावा काढल्या तर कर्णधार हरमन प्रीत ने ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाची अडखळत सुरुवात झाली. त्यानंतर दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेत थायलंडच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडलं. त्यातून थायलंडचा डाव सावरलाच नाही. थायलंडने पुढच्या तीन षटकात १२ धावात चार फलंदाज गमावले, अखेर थायलंडचा डाव २० षटकात ९ बाद ७४ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. सुरुवातीलाच दीप्ती शर्माने कमालीची गोलंदाजी केली. फिरकीपटू दीप्तीने ४ षटकात अवघ्या ७ धावा दिल्या आणि ३ विकेटस् घेतल्या त्याचबरोबर राजश्री गायकवाड हिनेही अवघ्या १० धावा देत २ विकेट घेतल्या, तर रेणुका सिंह, शेफाली वर्मा , स्नेहा राणा यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा