द “राज”कारण IN अंधेरी पोट निवडणूक

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२२: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काय निर्णय घेतात… याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण राज ठाकरे यांनी एकट्याने लढण्याचं जाहीर केलं आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.
असं सगळ्यांना वाटत असताना आता राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेवेळी भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या मदतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोंडी करणार का ? असे सवाल जनतेतून बाहेर येत आहेत.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीचे नक्की कारण समजू शकले नाही. पण तर्क-वितर्कावरुन तर अंधेरी पोट निवडणुकीसाठीची ही भेट असून त्यानुसार चर्चेत नक्की काय घडले, हे कालांतराने समजेल. पण जर ही भेट अंधेरी पोट निवडणुकीसाठीची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नक्कीच धक्का बसू शकतो.

ही चर्चा तासभर चालली. त्यानुसार नक्कीच काहीतरी खलबतं शिजली असावी, असं दिसतंय. ही भेट नक्कीच महाराष्ट्राच्या हितासाठी असावी, असा उच्चार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून केला जातोय.

वास्तविक ही लढत भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात असून त्यामुळे यात राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेक कंगोरे निर्माण झाले आहेत. ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल अशी ही लढत असताना अचानक राज ठाकरे यांनी भेट घेण्याचे नक्की कारण काय? असे संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता नक्की राजकारण काय झालंय आणि काय होतंय हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल. पण या भेटीचा परिणाम उद्धव ठाकरेंना जाणवेल का आणि त्याचा तोटा हाणार की फायदा होणार ? हे मात्र निवडणुकीच्या निर्णयानंतर कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा