सोलापूर, १७ ऑक्टोबर २०२२: महाराष्ट्र, गाेवा आणि साेलापूर बार असाेसिएशनच्या वतीने सरन्यायाधीश उदय लळीत यांचा रविवारी मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम साेलापूरकरांचा काैटुंबिक साेहळा हाेता. न्यायमूर्ती लळित हे आज, साेलापूरचे सुपुत्र म्हणून आले हाेते. या कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मृती मंदिराचे सभागृह तुडूंब भरले होते.
मंचावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती एस. एस. कर्णिक, न्यायमूर्ती जमादार, बार काैन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, राज्याचे महाधिवक्ता अॅड. आशुताेष कुंभकाेणी, जिल्हा व सत्र न्यायाधीश डाॅ. शब्बीर अहमद औटी आदींची उपस्थिती हाेती.
सरन्यायाधीश उदय लळीत म्हणाले, मी तरुण वकील असताना अभ्यासाला ग्रंथालय हा एकमेव पर्याय हाेता.आता सारख्या सोयी नव्हत्या. त्यावेळी नावाजलेले वकील ‘फली नरिमन’ यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी आम्ही न्यायालयात जायचाे. आजच्या स्पर्धेच्या युगात वकिली व्यवसायात सुरुवातीला थाेडासा त्रास हाेईलच. अडथळ्यांना पाहून माघार फिरणारे कैक आहेत. परंतु प्रामाणिक ध्येय बाळगून, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश निश्चित आहे.
महाराष्ट्र आणि गाेवा वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड. मिलिंद थाेबडे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे