‘हे’ कुत्रे पाळण्यास गाझियाबाद मधे बंदी

गाझियाबाद, दिनांक, १७ ऑक्टोंबर २०२२: गाझियाबाद येथे वाढत असलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे आता महापालिकेने गंभीर पाऊले उचलली आहेत. महापालिकेने तीन जातीच्या कुत्र्यांच्या संगोपनास बंदी घातली आहे. शनिवारी झालेल्या महानगरपालिका मंडळाच्या बैठकीत पिटबुल, रॉटवेलर आणि डॉगो अर्जेंटिनो या जातीच्या कुत्र्यांवर शहरात बंदी घालण्यात आली आहे.

ज्यांच्याकडे आधीच हे पाळीव कुत्रे आहेत त्यांना दोन महिन्याच्या आत त्यांची नसबंदी करावी लागणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास पाच हजारांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. तसेच इतर जातीचे कुत्रे पाळणाऱ्यांसाठी नवे नियम ठरवण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून हे नियम जारी केले जातील आणि कोणत्याही कुटुंबाला एकापेक्षा जास्त पाळीव कुत्रा पाळता येणार नाही.

उच्च सोसायटी मधे राहत असणाऱ्या पाळीव कुत्रांच्या मालकांना त्यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी सर्व्हिस लिफ्टचा वापर करावा लागेल. आणि सार्वजनिक ठिकाणी असताना त्या कुत्र्यांना मझल घालावी लागणार आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत शहरातील विविध भागात कुत्रा चावण्याच्या अनेक घटना समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा