सातारा, १८ ऑक्टोबर २०२२: राज्यभरात काल दिवसभर जोरदार पाऊस पडला आहे. साताऱ्यात देखील पाऊसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. अनेक नाल्यांना आणि ओढ्याना पुर आला होता. अशातच एक गाडी ओढा ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून गेली.
साताऱ्यातील फलटण तालूक्यातील सोमंथळी येथील ओढा ओलांडत असताना ही गाडी पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या गाडीमध्ये गुदमरुन बाप लेकीचा मृत्यु झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.
तर या अवकाळी पावसामुळं शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, तर अचानक पडलेल्या या पावसाचा अंदाज न आल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना फलटण तालूक्यातील सोमंथळी येथील एका गावात घडली.
ओढा ओलांडत असताना गाडी वाहून गेली, या गाडीत १३ वर्षीय प्रांजल आणि तिचे वडील छगन मदने वय ३८ या बाप लेकीचा गुदमरुन मृत्यु झाला आहे. दरम्यान नागरिकांनी पावसातून गाडी चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर