पुण्यात आढळला पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण! BQ.1 सब-व्हेरियंट पुण्यात. चिंता वाढली

12

पुणे, १८ ऑक्टोबर २०२२: कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या सब-व्हेरियंट आहे. BA.5.1.7 असे त्याचे नाव आहे. आता पुण्यात एका रुग्णामध्ये BQ.1 हा नवीन सब-व्हेरिएंट आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी गुजरातमध्ये BF.7 हा सब- व्हिरियंट आढळून आला होता.

या व्हिरियंटची सर्वात प्रथम चीनमध्ये नोंद झाली होती. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत १७.७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे‌. त्यामुळे आता राज्याच्या आरोग्य विभागाने XBB या सब-व्हिरियंटचा उल्लेख केला आहे.

जो आपल्या देशात प्रथमच आढळला आहे. हिवाळा आणि सणासुदीच्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीच्या तुलनेत १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान नवीन कोवीड-१९ प्रकरणांमध्ये १७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहीती प्रशासनाने दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. तर दाट लोकवस्ती असलेल्या नागरिकांनी विषेश काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आता सर्वात जास्त रुग्ण हे ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये आढळून येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर