पुणे, १८ ऑक्टोबर २०२२ सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असा एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एका स्कूलबस मध्ये तब्बल ११ फुट लांबीचा अजगर सापडला आहे.
उत्तर प्रदेश के रायबरेली में स्कूल की एक बस के इंजन में अजगर फंसा था।
कड़ी मशक़्क़त के बाद वन विभाग की टीम ने निकाला बाहर। pic.twitter.com/dfrZpZlZd4
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) October 16, 2022
उत्तर प्रदेशातील रायबरेली परिसरातील एका स्कूल बसमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्कूल बसच्या इंजिनमध्ये अजगर दिसतोय. ११ फुट लांब असलेल्या या अजगराला चक्क दोरीने काढले जात आहे. दोरीच्या मदतीने बसच्या तळात असलेल्या अजगराला ओढत बाहेर काढण्यात आले.
तर या ११ फुटी अजगराचे वजन किमान ३०० ते ५०० किलो इतके होते. त्यामुळे काही केल्या तो बाहेर पडेना. अखेर दोरीने त्याला बांधले आणि खेचून बाहेर काढण्यात आले. हे रेस्क्यु ऑपरेशन तब्बल ३ ते ४ तास सुरू होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.