पुणे, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ : पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिकत असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे असलेल्या एम आय टी महाविद्यालयामध्ये शिकण घेत असलेला तरुण जॉर्डन पब्लीसियेस याने महाविद्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता हॉस्टेल मध्ये कामावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना जॉर्डनने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्याने नेमके कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जॉर्डन हा मूळचा बंगळुरूचा असून तो डिझाईन विभागात चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर