वॉशिंग्टन, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने ‘पिलर्स ऑफ क्रिएशन’ची सर्वोत्तम छायाचित्रे टिपल्याची माहिती नासाने दिली आहे. या फोटोंमध्ये, वायू आणि धुळीच्या दाट ढगांमध्ये नवीन तारे तयार होताना दिसत आहेत. स्पेस एजन्सी च्या मते, थ्री डायमेंशनल पिलर भव्य खडकांसारखे दिसतात पण ते अधिक प्रमाणात झिरपू शकतात. हे स्तंभ थंड वायू आणि धूळ यांच्यापासून बनलेले असतात जे कधीकधी जवळच्या अवरक्त प्रकाशात अर्ध-पारदर्शक दिसतात.
टेलीस्कॉपे ने टिपलेल्या फोटोमध्ये हजारो तारे लखलखून, विश्वाच्या मध्यभागी उभे असलेले विशाल सोने, तांबे आणि तपकिरी खांब प्रकाशित करताना दिसत आहेत. अनेक खांबांच्या टोकांना चमकदार लाल, लावासारखे ठिपके आहेत. नासाने एका निवेदनात म्हटले आहे की, “हे अजूनही तयार होत असलेल्या ताऱ्यांचे उत्सर्जन आहे.” नासाच्या मते, नवे तारे अधूनमधून या जाड खांबांसारखे दिसणाऱ्या ढगांवर आदळत असतात. कधी कधी यामुळे लाटांसारखा नमुना तय्यार होतो.
यापूर्वी या दुर्बिणीने १९९५ आणि २०१४ मध्ये असे चित्र टिपले होते. परंतु एका वर्षापूर्वी अंतराळात प्रक्षेपित केलेल्या नवीन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या क्षमतेमुळे स्तंभांच्या अस्पष्टतेतूनदेखील अनेक नवीन तारे तयार होताना दिसत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर