पुणे, २२ ऑक्टोबर २०२२: टी-२० वर्ल्डकपच्या सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडीजचा ९ विकेट्स ने पराभव करत. आयर्लंड चा संघ टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ फेरीत पोहचला आहे. यामुळे वेस्ट इंडिजचे आयसीसी टी- २० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.वेस्ट इंडिज ने २० षटकात पाच गड्यांच्या बदल्यात १४६ धावा करत आयर्लंडला १४७ धावांचे लक्ष दिले होते, वेस्ट इंडिज कडून ब्रॅडम किंगणे सर्वाधिक ६२ धावा केल्या, त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याचं फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या आयर्लंडने ४.४ षटकांतच ५० धावा केल्या. त्यांचा कर्णधार सलामीवीर अँड्रॉयू बालबन्री आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या गड्यासाठी ४५ चेंडूत ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र यानंतर कर्णधार बालबन्री २३ चेंडू ३७ धावा करून बाद झाला. पण सलामीवीर स्टर्लिंग यांने ४८ चेंडू ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर आयर्लंड ने १७.३ षटकात केवळ एक विकेट गमावून १५० धावा करत सामना जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव