अफेअर पतीचे…आनंद पत्नीला!

44

पतीचे बाहेर अफेयर सुरू आहे, हे कळाल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली नाही अशी पत्नी अख्ख्या भूतलावर शोधून सापडणार नाही, असा दावा केला जातो. पण अमेरिकेतील सारा नावाच्या एका महिलेने ‘रेडीट’ या सोशल साईटबरोबर बोलताना पतीचे एका महिलेबरोबर अफेयर सुरू असल्याचे समजताच आपल्याला अत्यानंद झाला असे सांगून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

साराच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहे. तिला चार वर्षांची एक मुलगीही आहे. पण पती पत्नीमध्ये पटत नसून त्यांच्यात सतत वाद होतात. याचदरम्यान साराला पतीचे बाहेर एका महिलेबरोबर अफेयर असल्याचे समजले. पण ते ऐकून तिला त्रास झाला नाहीच. उलट अत्यानंदच झाल्याचे तिने रेडीट या सोशल साईटवर सांगितले आहे. त्यानंतर अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे साराला सगळ्यांना आपली लाईफ स्टोरीच सांगावी लागली. आमचे एकमेकांबरोबर पटत नाही. त्यामुळे पती पत्नीमध्ये असलेली ओढ आमच्यात नाही. परिणामी पतीपत्नीचे नातेच संपुष्टात आले आहे. असे साराने सांगितले. तसेच याचा परिणाम आमच्या ‘सेक्स लाईफ’वरही झाला आहे. माझा दिवस फक्त मुलीची देखभाल आणि नोकरीत जातो. तर पती त्याच्या कामात बिझी असतो.

पण काही दिवसांपूर्वी मला माझ्या पतीच्या अफेयरबद्दल समजलं. ते ऐकून मला काहीच झाले नाही. उलट आनंदच झाला की त्याला अपेक्षित नात भेटलं आहे. त्यात काही गैर असल्याचे मला वाटत नाही. कारण काही दिवसांपूर्वी भेटलेल्या माझ्या एका मित्रानेही मला कुठलीही अपेक्षा न ठेवता आयुष्य जगण्याचा सल्ला दिला आहे, असंही साराने म्हटले आहे.