देशात गेल्या २४ तासात ८६२ नवे कोरोना रुग्ण, तर १,५०३ रुग्णांना डिस्चार्ज

नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर २०२२: देशातून कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मागील २४ तासात नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार देशात ८६२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४ कोटी ४६ लाख ४४ हजार ९३८ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ५,२८,९८० जणांनी आपला जीव गमावला आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1584756583573393409?t=RMSASiQuAx5p_bsWMg5yOw&s=19 सोमवारी देशात १ हजार ५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत ४ कोटी ४० लाख ९३ हजार ४०९ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात २२ हजार ५४९ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल एका दिवसात २३,७९१ जणांना लसीचे डोस दिले. तर आतापर्यंत देशातील २१९ कोटी ५६ लाख ६५ हजार ५९८ डोज लसीकरण पूर्ण झाले आहे. https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1584761956115718145?t=yj5yVa52LA9ZqsNuvAnrXg&s=19 दरम्यान, देशातील रिकव्हरी दर आता ९८.७६ टक्क्यांवर आहे तर ॲक्टिव्ह रुग्णांचा दर ०.०५ टक्के आहे. देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट १.३५ टक्क्यांवर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा