उर्वशी रौतेला फोटो पोस्ट करत म्हणाली, मूव्ह ऑनची हीच वेळ

पुणे, २५ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांची नाव सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसापूर्वी उर्वशी टी ट्वेंटी वर्ल्डकप पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. आणि इंडिया पाकिस्तान मॅच झाल्यानंतर आता उर्वशी पुन्हा भारतात परतत आहे. त्याचं दरम्यान तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये फ्लाईटमधील काही फोटो शेअर केले आहेत. पण फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने लिहिले की ‘निघताना माझं हृदय तुटलं आहे. पण मूव्ह ऑन करण्याची वेळ आली आहे’. या आशयाचे कॅप्शन उर्वशीने दिले आहे.

ऋषभ पंत सध्या भारतीय टीम सोबत आगामी टी ट्वेंटी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. अशातच उर्वशी देखील त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. तेव्हां ही सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी उर्वशीने रिषभ पंत बद्दल वक्तव्य केलं होतं त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये शीत युद्ध झालं होतं. मात्र त्यानंतर उर्वशी ने पंतची माफीही मागितली होती. पण आता पुन्हा एकदा उर्वशी तिच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे चर्चेत आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा