आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास विविध स्तरातून पाठिंबा, आंदोलनाची धार वाढली

उस्मानाबाद, २७ ऑक्टोबर २०२२ : शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा यासह इतर मागण्यासाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे मागील चार दिवसापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला जिल्ह्यातुन विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. दरम्यान आज (२७, अक्टोबर) कैलास पाटील यांनी खड्ड्यात गाडून घेत आंदोलन सुरू केले आहे.

आमदार कैलास पाटील यांनी सोमवार दि. २४ ऑक्टोंबर पासून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी उपोषण सुरू केले आहे. शासनाकडून ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून या उपोषणास विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतींनी उपोषणास पाठिंबा दिला आहे.

याचबरोबर उपोषणस्थळी हजारो शिवसैनिक, शेतकरी दररोज येवून भेटत आहेत. त्यामुळे सरकारने याची गांभिर्याने दखल घेवून पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा