Akasa Air च्या विमानाला पक्षाची धडक

अहमदाबाद, २७ ऑक्टोबर २०२२: अहमदाबादहून दिल्लीला जाणाऱ्या Akasa Air च्या विमानाला गुरुवारी सकाळी पक्ष्याने धडक दिली. पक्ष्याने धडक दिल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच लाँच केलेल्या बजेट एअरलाइन ‘Akasa Air’द्वारे चालवल्या जाणार्‍या बोईंग B-737-8 विमानाला १९०० फूट उंचीवर पक्षी आदळल्याने रेडोमचे नुकसान झाले. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, QP-1333 या विमानाला पक्ष्याने धडक दिली. हे विमान अहमदाबाद ते दिल्ली दरम्यान उड्डाण करत होते. विमान लँड झाल्यानंतर त्याच्या नाकाच्या बाजूला नुकसान झाल्याचे लक्षात आले. तर फोटोमध्ये विमानाच्या पुढील बाजूला पक्ष्याचं रक्त लागल्याचे दिसत आहे.

सर्व प्रवाशांसह विमान सुखरूप उतरले

‘Akasa Air’ च्या प्रवक्त्याने सांगितले की, २७ ऑक्टोबर रोजी अहमदाबादहून दिल्लीला उड्डाण करणारे Akasa एअर फ्लाइट QP 1333 ला पक्ष्याने धडक दिली. त्यानंतर विमान दिल्लीत यशस्वीरित्या उतरले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा