पती पत्नीतील नातं टिकवण्यासाठी आणि उत्तरोत्तर घट्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

महागड्या हिऱ्याच्या अंगठीपेक्षा एक गुलाबाचं फुल दिलं तरी तुमची पत्नी खूश होईल. कारण कोणत्याही नात्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम.

जर तुमच्या नात्यात प्रेमच नसेल तर बाकी सर्व नाती निरर्थक ठरतात.

तुम्ही ऑफिसच्या कामात कितीही व्यग्र असला तरी हे विसरू नका की जेवढं तुमचं काम महत्त्वाचं आहे तेवढंच तुमचं नातंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पत्नीला वेळ देणंही गरजेचं आहे. तिला हा विश्वास दाखवा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात.

तुमची पत्नी हाउस वाइफ असो किंवा वर्किंग वुमन तिच्याशी दिवसातला काही वेळ तरी बोलाल याकडे लक्ष द्या.

पत्नीला तिचा पूर्ण दिवस कसा गेला याबद्दल विचारा आणि त्यानंतर स्वतःच्या दिवसाबद्दल सांगा. यामुळे एक घट्ट नातं तयार होतं.

तिच्या प्रत्येक गोष्टीवर होकारार्थीच बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाही. असं केलं तर तिला वाटेल तुमचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार तुम्ही पत्नीच्या बोलण्याचं उत्तर देणं गरजेचं आहे.

घर आणि मुलं सांभाळण्याची जबाबदारी फक्त पत्नीचीच नाही हे लक्षात ठेवा. संसारातल्या प्रत्येक गोष्टी या दोघांनी मिळून करायच्या असतात. एकाच्याच खांद्यावर जर या दोन्ही गोष्टी गेल्या तर एकाची चिडचिड होते आणि नात्यात कटूता येते.

एकत्र फिरायला जायला कधीही विसरू नका. यावेळी एकत्र घालवलेले क्षण तुम्ही संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत.