आत्मविश्वास वाढवायचाय? या टिप्स नक्की वापरा!

‘आत्मविश्वास’ या शब्दातच यशाचे गमक दडलेले असते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. काही खास टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकता…
 
1) टेंन्शन नही लेने का : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेंन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेंन्शन घेतलं कि, आत्मविश्वास कमी होत असतो.
 
2) पेहरावाकडे लक्ष द्या : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्याने तुम्ही लोकांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चार-चौघात आपण कसे दिसतो? अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.
 
3) यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी काही लोकं असतात. ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्य द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनुकरण करा.
 
4) प्रयत्न करा: एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.
 
5) तुलना नको : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करू नका. कारण समोरचा कसा आहे? हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते. म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.
 
6) मान्य करा : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका.
 
7) बिनधास्त बोला : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल. तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.
 
8) स्वत:ची स्तुती करा : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
 
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा