नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडायला सुरवात

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात झाली असून, मुंबईत असलेल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाविरोधात राणे सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

सर्वोच्च न्यायालयाने राणेंची याचिका फेटाळून लावल्यानंतर आता ‘अधीश’मधील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे श्री. राणेंनी स्वतःहून हातोडा मारत बांधकाम पाडायला सुरवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटविले जाईल.

बंगल्यावरील अनधिकृत भाग काढून नकाशाप्रमाणे नियमानुसार बांधकाम ठेवले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की न्याय सर्वांसाठी समान आहे. घराचा ‘एसएफआय’ वाढवून घेण्यास जर तुम्हाला परवानगी दिली तर मुंबईतून अशा किती याचिका येतील; तसेच अशा प्रकारे परवानगी दिल्यास मुंबईत किती अनधिकृत बांधकामे अधिकृत होतील, असे सांगितले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राणेंची याचिका फेटाळल्यानंतर आज सकाळपासूनच ‘अधीश’वरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा