भारतीय लष्कर ‘पीओके’ घेण्यास तयार

नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर २०२२: काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्न सुरू असतो. याविरोधात लष्कर नेहमी कारवाई करीत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी लष्काराने मोठी कारवाई केली होती. दरम्यान, लष्करही पीओके परत घेण्याच्या तयारीत आहे, असे लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माहिती दिली आहे.

भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीरवर (पीओके) कारवाई करण्यास तयार आहे. त्यासाठी केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महिती दिली आहे. ते म्हणाले, की ‘पीओके’च्या मुद्द्यावर संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. भारत सरकार जेव्हा आदेश देईल तेव्हा सैन्य पूर्ण तयारीनिशी पुढे जाईल; तसेच द्विवेदी म्हणाले, की १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानने ‘पीओके’वर अतिक्रमण केले. पंतप्रधान नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करून युद्धबंदीची सूचना केली. त्यामुळे हा भाग पाककडे तसाच राहिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद रोखण्यासाठी बऱ्याच प्रमाणात काम झालंय. त्यामुळे गोंधळलेले दहशतवादी कधी पिस्तूल, कधी हत्यार पाठविण्याचा प्रयत्न करतात. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जातय; पण दहशतवादी आपल्या इराद्यात कधीही यशस्वी होणार नाहीत, असं लेफ्टनंट जनरल म्हणाले.

‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. ज्याची पाकिस्तानची सीमा आहे. १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानने आदिवासी बंडखोरांच्या मदतीने जम्मू-काश्मीरचा हा भाग ताब्यात घेतला. सध्या पाकिस्तानने ‘पीओके’चे गिलगिट आणि बाल्टिस्तान असे दोन भाग केले आहेत; तसेच २२ फेब्रुवारी १९९४ रोजी संसदेत एकमताने मंजूर झालेल्या ठरावाची सरकारला अंमलबजावणी करायची आहे, जेणेकरून भारताकडून हिसकावलेले गिलगिट आणि बाल्टिस्तानसारखे उर्वरित भाग पाकिस्तानकडून मिविवता येतील.

तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांना एक व्हॉट्सॲप मेसेज आला. फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचे त्यात म्हटले आहे. सोमवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर हा ऑडिओ संदेश आला. गुन्हे शाखेने संदेश पाठविणाऱ्या तरुणाची ओळख पटवली आहे.

उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे बोलतात, की भारतात घुसखोरी करण्यासाठी सुमारे १६० दहशतवादी पाकिस्तानी लाँचपॅडवर आहेत. त्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. पीर पंजालच्या उत्तरेला १३०, तर पीर पंजालच्या दक्षिणेला ३० दहशतवादी आहेत. एकूण ८२ पाकिस्तानी दहशतवादी आणि ५३ स्थानिक दहशतवादी संपूर्ण भागात लपलेले आहेत. लष्कराने ‘पीओके’ परत घेण्याबाबत वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. द्विवेदींच्या वक्तव्यापूर्वी, श्रीनगरमध्ये आर्मी दिनानिमित्त, चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल एडीएस औजला म्हणाले होते, की लष्कर ‘पीओके’ गाठण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आदेश मिळाल्यास आम्ही मागे वळून पाहणार नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा