अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टची किंमत १६ लाखांपर्यंत; चाहते म्हणाले….

पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह पुढच्या वर्षी जानेवारीत पुण्याच्या द मिल्समध्ये कॉन्सर्ट करणार आहे. त्याच्या या कॉन्सर्टसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, या कॉन्सर्टचे तिकीट ऐकूनच चाहत्यांच्या पोटात गोळा आला आहे. ९०० ते तब्बल १६ लाखपर्यंत या कॉन्सर्टचे तिकीट असणार आहे.

  • तिकीटांची किंमत पाहून चाहते निराश

पुण्यात होणार्‍या कॉन्सर्टच्या तिकिटांच्या दरांमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. तिकीट-बुकिंग साईटनुसार, प्रीमियम लाऊंज वनच्या तिकीटांची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहेत. त्यात ४० खुर्च्या बसू शकतात. अनलिमिटेड अन्न आणि प्रीमियम मद्य असेल. यात उपस्थितांसाठी स्टार्टर्स, मेन कोर्स देखील असतील.

तर मोकळ्या एरियामध्ये किंमती ९९९, प्रीमियम लाऊंज २ ची किंमत १४ लाख रुपये, ३ ची किंमत १२ लाख रुपये आणि चारची किंमत १० लाख रुपये आहेत. यात किमान लाऊंज २ मध्ये ४०, ३ आणि २ मध्ये ३० सीट्स असणार आहे. हे पाहून चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया :

‘एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आम्ही घरी बसू, तर एकाने म्हटले आहे की, मला अरिजीत आवडतो पण मी एवढे पैसे नाही देणार, एवढ्या पैश्यात साब्याबाचीचा लेहंगा येईल, त्यापेक्षा गाणं ऐकून एकांतात रडू, अशा आशयाचे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१६ लाख तिकिटासाठी दिले तर त्याने आमच्या घरी येऊन आम्हाला गाणे ऐकवले पाहिजे अशा मजेशीर कमेंट दिल्या आहेत.

दरम्यान, अरिजीत सिंह याची आतापर्यंतची अत्यंत यशस्वी अशी कारकीर्द आहे आणि त्याला भारतातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक मानले जाते. त्याचा चाहत वर्ग बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या शेजारील देशांमध्ये सुद्धा विस्तारला आहे. नुकताच रिलीज झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील “केसरिया” हे सुपरहिट गाणे अरजितने गायले असून अजूनही सर्वांच्या मानत घर करून आहे.

न्युज अनकट प्रतीनिधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा