‘भेडिया’ चित्रपटाचे चार दिवसांतच सर्व चित्रपटगृहांवर राज्य

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ : सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांची एकमेकांमध्येच जबरदस्त टक्कर सुरू आहे. हे दोन बॉलीवूड चित्रपट म्हणजे अजय देवगणचा ‘दृश्यम २’ आणि नुकताच वरुण धवन आणि कृती सेना यांचा प्रदर्शित झालेला ‘भेडिया’ हा चित्रपट. हा चित्रपट टूडी आणि थ्रीडीमध्ये रिलीज करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हिंदीशिवाय तेलुगू व तमिळ भाषांतही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

‘भेडिया’ चित्रपटाची कथा :
भास्कर शर्मा नावाच्या लहानसहान कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जंगलातून रस्ता काढण्यासाठी गावकऱ्यांकडून जमिनी काढून घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट भास्करला मिळालेले असते. त्यासाठी तो त्याचे वडिलोपार्जित घरही घाण टाकतो व चुलतभावाबरोबर हिमाचल प्रदेशात पोचतो. तिथे भास्करच्या मागे लांडगा लागतो, भास्कर झाडाला लटकतो! पण लांडगा त्याचा पार्श्वभागाचा लचका तोडतो. उपचारांसाठी भास्करला जनावरांचा डॉक्टरांकडे आणले जाते व डॉक्टर उपचार करतात. दुसऱ्या दिवशी भास्करची जखम बरी होते. भास्कर तरुणांच्या लीडरशिपशी हातमिळवणी करून सह्या करतो. आणि त्यानंतर कल्पनेच्या पलीकडे असलेल्या घटना घडण्यास सुरवात होते.

२५ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या ‘भेडिया’ या चित्रपटाने आतापर्यंत ३२.४० कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या पहिलाच दिवशी या चित्रपटाने ७.४८ कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी ९.५७ कोटींची कमाई करत रविवारी या चित्रपटाने ११.५० कोटींचा टप्पा गाठला. तर काल म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३.८५ कोटींचा बिझनेस केला. ‘भेडिया’ या चित्रपटाचं बजेट आहे ६० कोटी. चार दिवसांतच अर्ध्या बजेटची किंमत चित्रपटाने वसूल केली आहे. या आठवड्यात भेटूया हा चित्रपट हिट ठरला की फ्लॉप हे पाहता येणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील ‘भेडिया’ चित्रपटाची कमाई ही चित्रपटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर ‘भेडिया’ या चित्रपटाच्या चार दिवसांच्या कमाईवरून हा चित्रपट ‘दृश्यम २’च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबरोबर टक्कर देत असल्याचे दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा