पिंपरी-चिंचवड, ता. ७ डिसेंबर २०२२ : जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालय, (मतिमंद मुला मुलींसाठी) निगडी येथे सोमवारी (ता. पाच) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ‘मास्टेक फाउंडेशन’च्या सी.एस.आर. विभागाचे प्रमुख श्री. जालिंदर सातपुते, संग्राम पाटील याचबरोबर संस्कार भारती, पिंपरी चिंचवडचे समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कलासाधक श्री. भाग्येश अवधानी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी ‘मास्टेक फाउंडेशन’तर्फे शाळेला संगीतवाद्य संच (तबला, ढोलकी व इतर) आणि संस्कार भारती पिंपरी- चिंचवड यांच्यातर्फे उद्योजक श्री. दिपक काशीकर प्रायोजित ‘मिरॅकल- ओ- लाईन्स’ डिझाईन संचाची भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ब्रह्मदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र जोशी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.