बीएसएफ जवानाला पाक रेंजर्सनी पकडलं, धुक्यामुळं दिसली नाही झिरो लाईन

पंजाब, ९ डिसेंबर २०२२: पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान बुधवारी सकाळी चुकून पाकिस्तानी हद्दीत पोहोचला. दाट धुक्यात त्याला झिरो लाईन दिसली नाही. जवान पाकिस्तानी सीमेवर पोहोचताच पाक रेंजर्सनी त्याला अटक केली.

पाक रेंजर्सनी जवानाला ताब्यात घेतल्याची पुष्टी केलीय परंतु ते त्याला परत न करण्यावर ठाम आहेत. ही घटना बीएसएफच्या फिरोजपूर सेक्टरची आहे.

पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी आणि शस्त्रास्त्रं आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारतानं कुंपण घातलंय. सुमारे १२ फूट उंचीचं हे कुंपण भारतीय हद्दीत करण्यात आलं असून त्यापुढं ३०० ते ५०० मीटर भारताचा भूभाग आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा (शून्य रेषा) आहे जिथं पांढरी रेषा ओढली जाते. कुंपणाच्या पलीकडं भारतीय हद्दीतही शेतकरी शेती करतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा