‘हॅलो MLA ,… रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबाला खास शुभेच्छा!

गुजरात, ९ डिसेंबर २०२२ :गुजरात विधानसभेचा २०२२ चा निकाल जनतेसमोर आले असून, भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, जामनाग उत्तर मतदारसंघातून पहिल्याच प्रयत्नात निवडणूक जिंकून आमदार झालेल्या रिवाबा जडेजा यांच्याबद्दल त्यांचे पती आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या विजयानिमित्त त्याने रिवाबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सोबतच रवींद्र जडेजाने रिवाबाचे अभिनंदन करणारे ट्विट केले असून जामनगरच्या जनतेचे आभार मानले आहेत. जडेजाने ट्वीट करताना ‘हॅलो MLA , तुम्ही खरोखरच याच्या हकदार असून, जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आशापुरा मातेकडे जामनेरची कामे खूप चांगली होवो हिच विनंती. जय माताजी! असे म्हटले आहे.

रिवाबा आणि रविंद्र जडेजाने २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना यंदाच्या निडवणुकीत जामनगर उत्तरमधून आमदारकीच्या रिंगणात उतरवले. त्यासाठी पक्षाने तत्कालीन आमदार धर्मेशसिंह एम. जडेजा यांच तिकीट कापले होते. भाजपने दाखवलेला विश्वास रिवाबाने सार्थ करून काँग्रेसच्या बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांचा ४० हजार ९६३ मतांनी पराभव केला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा