जम्मू-काश्मीर : दहशतवाद्याच्या घरावर कारवाई; सरकारने चालवला बुलडोझर

पुलवामा, १० डिसेंबर २०२२ : जम्मू-काश्मीरमधील सरकारी जमिनीवर कब्जा करून बांधलेले दहशतवादी आशिक नेंगरूचे घर शनिवारी अतिक्रमणाखाली पाडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा भागातील न्यू कॉलनीमध्ये आशिक नेंगरूचे घर होते. सरकारी जमिनीवर कब्जा करून त्याने हे घर बांधले होते. ते आज बुलडोझर च्या सहाय्याने पडण्यात आले.

दरम्यान, दहशतवादी आशिक नेंगरू हा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नवा चेहरा जम्मू-काश्मीरमध्ये समोर आला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये राहतो, त्याची मालमत्ता आज न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आली आहे.

सुरक्षा एजन्सीनुसार, आशिक नेंगरू पीओकेमध्ये तळ ठोकून आहे. अलीकडेच एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याबद्दल मोदी सरकारने जेएम कमांडर आशिक नेंगरूला दहशतवादी घोषित केले होते. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यात नेंगरूचा हात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा