मुंबई : देशातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटनर कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया-एअरटेलने आपल्या नवीन प्रीपेड प्लॅनची सोमवारी घोषणा केली आहे.
या नव्या प्लॅनअंतर्गत व्हॉइस कॉल आणि डेटाचे दर ४२ टक्क्यांनी महागणार आहेत. ३ डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
व्होडाफोन-आयडिया-एअरटेलचे जुने प्लॅन कोणते आहेत याची माहिती घेऊया आणि फायदा उठवूया –
एअरटेलचा ३९९, ४४८ आणि ४९९ रुपयांचा जुना प्लॅन आहे. ३९९ रुपयांच्या प्लॅमध्ये दिवसाला १ जीबी डेटा मिळत असून याची वैधता ८४ दिवसांची आहे. ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा मिळत असून याची वैधता ८२ दिवसांची आहे. ३ डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत ५९८ रुपये होणार आहे. तसेच ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळत असून याची वैधता ८२ दिवसांची आहे. डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत ६९८ रुपये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला २०० रुपये वाचवण्याची अजूनही संधी आहे.
व्होडाफोनचा ३९९, ४५८ आणि ५०९ रुपयांचा प्लॅन आहे. ३९९ च्या प्लॅनमध्ये दिवसाला १ जीबी डेटा मिळत असून याची वैधता ८४ दिवस आहे. ४५८ च्या प्लॅनमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा मिळत असून याची वैधता ८४ दिवसांची आहे. ३ डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत ५९९ रुपये होणार आहे. म्हणजे जवळपास १५० रुपये जास्त खर्च करावे लागतील. यासह ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवासाला १.५ जीबी टेटा मिळत असून वैधता ९० दिवसांची आहे.
आयडिया कंपनीकडे ८४ दिवसांची वैधता असणारा ३९९ रुपयांचा एकच प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला १ जीबी डाटा आणि रोज १०० मेसेज मोफत मिळतात. ३ डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत वाढणार आहे, त्यामुळे संधीचा फायदा घेऊन आजच रिचार्ज करा.
हे आहेत नवे प्लॅन
व्होडाफोन-आयडियाने सर्वात स्वस्त १९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. यात युजर्सना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि दोन दिवसांची वैधता आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये हायस्पीड डेटा आणि कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय २८ दिवस, ८४ दिवस, ३६५ दिवसांच्या वैधतेचे नवे प्लॅनही आहेत. १६९९ रुपयांचा प्लॅनची किंमत आता २३९९ रुपये झाली आहे. ही वाढ सर्वाधिक, ४१.२ टक्के इतकी आहे.
अनलिमिटेड श्रेणीतील दिवसाला १.५ जीबी डेटा असलेला ८४ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आता ५९९ रुपयांना मिळेल. सध्या हा प्लॅन ४५८ रुपयांना मिळत आहे. म्हणजे कंपनीने ३१ टक्क्यांची वाढ केली आहे. दिवसाला १.५ जीबी डेटा देणार्या १९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता २४९ रुपये होणार आहे.
२९९ आणि ३९९ रुपयांचे पॅक ३ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तर ३९९ रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.