विकीर

   फ्राईड राइस आणि शेजवान चटणी

हातात चार  पाच रेस्तोरंटचे मेनू कार्ड घेऊन काय ऑर्डर करू विचार करत होतो… एकटा असलो कि ऑर्डर ठरलेली असते. नुड्ल्स, फ्राईड राइस किंवा मग बिरियानी. मित्र सोबत असले कि ऑर्डर द्यायचं टेन्शन नसत. इतर वेळेस मेनू कार्ड मधून ऑर्डर देण म्हणजे मला न जमणार काम वाटत. नंबर लावला, जी ऑर्डर तोंडात येईल ती देऊन टाकू असा विचार करत असताना समोरून हेल्लो ऐकल आणि  फ्राईड राइसची ऑर्डर देऊन टाकली .
आता ऑर्डर येईपर्यंत फ्रेश होणार तोच माझा फोन वाजला…सोनल वोडाफोन अस नाव ट्रूकाॅलर वर दिसल… घरी कोणी नसताना मुलीच नुसत नाव जरी फ्लश झाल तरी मनातल्या कोपऱ्यातला  ‘छोटा रणजीत’ जागा होतो. सोनल नाव छान वाटत पण  दिवसभर जीन्स घालून फिरणाऱ्या माणसाची व्यथा दिवसभर जीन्स घालून फिरणाऱ्या माणसालाच माहित असते, त्यामुळे त्या सोनलचा कॉल ऱिजेक्ट करून मी आंघोळीला निघून गेलो… बर बाथरूम मधल्या गोष्टी खूपच पर्सनल असतात त्यामुळे न बोललेल बर… पण आत गेलो आणि  मला ती दिसली …ईम्यगिनेशन नव्हतं ते माझ… खरच ती होती ती तिथे … थेट माझ्या डोळ्यात बघत…
एरवी मित्रांसमोर,  चार लोकांसमोर माझ्यात खूप गट्स असल्यासारखा मी घाबरत नाही तीला पण अस एकट्यात जाम फाटते माझी… खूप वेळ  आम्ही थेट एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो… इतक्यात बेल वाजली, माझ पार्सल आय मीन ऑर्डर आली होती… बाथरूमच्या दरवाजातूनच ओरडलो – आया आया SSS तस मगामध्ये पाणी घेतलं आणि भिंतीवर तिच्यापासून थोड लांब उडवलं … तशी ती तुरुतुरु  शेपटी हलवत बाथरूमच्या खिडकीतून निघून गेली…तसा  माझ्यावरचा CCTV  कॅमेरा बंद झाल्यासारखं वाटल… आयुष्यात पहिल्यांदा  म्हणजे मोठा झाल्यापासून पहिल्यांदा कोणत्यातरी मादीने मला तस पाहिलं असेल… तसाच टॉवेल गुंडाळून, (DDLJ  च्या काजोलसारख नाही तर सावरीयां च्या रणबीर सारखा ) ऑर्डर घ्यायला गेलो… आणि हो, मी बाथरूमचा दरवाजा उघडच ठेवला होता … पालीच्या भीतीने  नाही तर टीव्ही वरची गाणी ऐकायला यावीत म्हणून … पार्सल घेतलं आणि  पाकीट घेऊन परत आलो तर हा आईसारखा, रात्री उशिरा आल्यावर दारूचा वास हुंगायचा प्रयत्न केल्यासारखा काहीतरी हुंगत होता … त्याला बोललो – कोई नही है  बे… तर तो मी मन कवडा असल्यासारखा  माझ्याकडे बघून हसला … वैसा नही  सर । मी – फिर कैसा ? तो- कूछ नही  सर बोलत हसत निघून गेला…  दरवाज्या बंद केल्यावर माझी ट्यूब पेटली, मी खाली टॉवेलकडे पाहिलं; च्यायला त्याने तसा विचार केला वाटत…

फ्राईड राइस घेऊन टीव्ही समोर बसलो, मस्त सोया, चिली सॉस आणि शेजवान चटणी आईने आणलेल्या केळीच्या पानच डिझाइन असलेल्या प्लेटमध्ये थोड ऑड वाटत होत पण ठीकेय ना… ऑफिसच्या पीपीटीपेक्षा पकाऊ वाटत नव्हत.  टीव्हीवर मॅकडाॅवेल्सची जाहिरात लागलेली…वेगळीच वाटली आज ती जाहिरात…

खरतर मित्रांशिवाय दारूला मजा नाही म्हणतात… मला अनुभव नाही पण चायनीजच पण वेगळ नाहीच ना…

आजच्या ऑर्डर सोबत  मित्रांची कमी होती… आणि कमी होती, ऑर्डर यायच्या आधीच्या फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी सोबतच्या गप्पांची…

तेवढ्यात व्हाटसअप वाजला, जाड्या बिपीनने पाच पाच फोटो पाठवले होते, खाली caption होती, आईने आज घरी नॉनवेज केलंय आणि दात विचकल्याच्या स्मायली…

मी पण रीप्लाय केला- HAVING FRIED RICE WITH SONAL…

तसा खण खण माझा Whatsapp वाजायला लागला… मी मुद्दामच रिप्लाय नाही केला, मजा घेत होतो…

खाऊन झाल्यावर मोबाईल पाहिला …
आमच्या कॉलेजच्या whatsapp group ग्रूपच नाव चेंज झालं होत  –

जिद्दी जजबात वरून,  विकीर कि सुहागरात…

आणि डीपी होता –  अलका कुबलचा

का ते मला पण नाही कळल पण रात्री चॅट करायला सगळ्यांना खुराक मिळाला होता …

फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी तेवढी नव्हती…

क्रमश :

© अविनाश  उबाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा