महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा,वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे पंढरपूर,शिर्डी , पैठण, शनि शिगनापुर आदी थिकानी भेटी देतात.हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परदेशी पर्यटकांत १९९०पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणारांचे प्रमाण वाढीस लागले.
देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे
मुंबईपासूनची अंतरे:
- आंबोली – ५४९ किमी
- खंडाळा – १०० किमी
- चिखलदरा – ७६३ किमी
- जव्हार – १८० किमी
- तोरणमाळ – धुळ्यापासून ४० किमी
- पुणे – १७० किमी
- पन्हाळा – ४२८ किमी
- पाचगणी–
- भंडारदरा – १८५ किमी
- महाबळेश्वर – २५६ किमी
- माथेरान – १११ किमी
- म्हैसमाळ – औरंगाबादहून ४० किमी
- लोणावळा – १०४ किमी