भारताचा बांगलादेशला व्हाईटवॉश

श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनमुळे हरता-हरता जिंकला भारत

पुणे, २५ डिसेंबर २०२२ : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी ७ गडी गमावून १४५ धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करीत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशला दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असा व्हाईटवॉश दिला.

या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३१४ धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात २३१ धावा करू शकला आणि भारतासमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या होत्या.

सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट क्रीजवर होते. उनाडकटने १६ चेंडूत १३ धावा केल्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याच्यानंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात ९३ धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतला दुसऱ्या डावात केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. मेहदी एवढ्यावरच थांबला नाही. अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करीत त्याने डावातील पाचवे यश मिळविले. अक्षरने ६९ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

७४ धावांवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या तेव्हा बांगलादेश चमत्कार करू शकेल, असे वाटत होते. भारतीय संघ दडपणाखाली होता. येथून श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने डाव सांभाळला. आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून दोघांनी ७१ धावांची नाबाद भागीदारी करईत संघाला विजय मिळवून दिला. अश्विन ६२ चेंडूत ४२, तर श्रेयस अय्यरने ४६ चेंडूत २९ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३१४ धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात २३१ धावा करू शकला आणि भारतासमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने चौथ्या दिवशी ७ गडी गमावून १४५ धावांचे लक्ष्य गाठले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा