तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण! शीझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, ३१ डिसेंबर २०२२ : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी वसई न्यायालयाने आरोपी शीझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांचे जबाब नोंदवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिचा प्रियकर मोहम्मद शीझान याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. पण तुनिषाच्या आईने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून शीझानची चौकशी करायची असल्याने त्याला अजून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तुनिषा शर्मा ‘अलीबाबा : दास्तान ए कबूल’ या मालिकेत काम करत होती. मालिकेतील सहकलाकार शिजान खानवर तुनिषा प्रेम करत होती. मात्र, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा प्रियकर आणि को-स्टार शीझान खानच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. शुक्रवारी तुनिषाच्या आईने शीझानवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. याशिवाय शीझानवर तुनिषावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, कोर्टाने शीझानला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असली तरी त्याचे कुटुंबीय लवकरच याप्रकरणी जामीन अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत अभिनेत्याचे कुटुंबीय कागदोपत्रांची तयारी करत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा