मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सिद्धार्थ आणि कियारा अडकणार लग्नबंधनात

20

मुंबई, १ जानेवारी २०२३ :बॉलिवूडसाठी २०२२ हे वर्ष खूप खास होते. २०२२ मध्ये अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकले. तर काहींच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले. आता सुरू झालेले नवीन वर्ष म्हणजेच २०२३ सुद्धा असेच खास असणार आहे. रणबीर कपूर- आलिया, विकी – कतरिना नंतर आता आणखी एक लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडणार आहे.

  • राजस्थानमध्ये होणार लग्न

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारी २०२३ ला लग्नबंधनात अडकणार आहेत. तर ४ फेब्रुवारीपासून त्यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. यात मेहंदी, हळदी आणि साखरपुडा या सर्व कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीय आणि काही खास पाहुणे सहभागी होणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थचे लग्न अत्यंत कटेकोट सुरक्षा व्यवस्थेत राजस्थान येथील आलिशान जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे.

  • सिद्धार्थ – कियाराचे आगामी चित्रपट:

सिद्धार्थ आणि कियारा सध्या नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला गेले आहेत. कियाराचा नुकताच ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. कियारा कार्तिक आर्यनसह ‘सत्यप्रेम की कथा’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेरशाह’नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीची वेबसीरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय कियारा ‘आरसी 15’ या चित्रपटात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत ‘पुष्पा: द राइज’ फेम रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय सध्या तो ‘योद्धा’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.