नवी दिल्ली, ७ जानेवारी २०२३ : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा याला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बंगळुरू येथून त्याला अटक केली आहे. ही घटना समोर आल्यापासून पोलिसांची ३ पथके आरोपी शंकर मिश्रा याचा शोध घेत होती. अखेर लज्जास्पद कृत्य करणाऱ्या त्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बंगळुरूमध्ये सापडले होते. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा शोध घेण्यात आला. मात्र, मिश्रा त्याचा फोन सातत्याने बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्या बंगळुरू पोलिसांना यश आले आहे.
- शंकर मिश्राची कंपनीकडून हकालपट्टी
शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोनं त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. कंपनीच्या वतीने एक निवेदन जारी करताना म्हटले होते की, कंपनी आपल्या कर्मचार्यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही कंपनीने म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.