बंगळुरु : मेट्रोचे काम सुरू असलेलाच खांब कोसळला, दोघांचा मृत्यू

बंगळुरु, १० जानेवारी २०२३ : कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. बंगळुरुच्या नागवाडामध्ये मेट्रोचा बांधकाम सुरू आहे. येथील एक खांब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमीही झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० .४५ च्या सुमारास मेट्रोचे बांधकाम सुरू असलेला खांब कोसळला. या खांबाची ४० फुटपेक्षा अधिक तर वजन काही टन होते. कोसळलेल्या खाबाला एका दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर चार जण स्वार होते. दुचाकीवर लोहीत याच्यासोबत त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्यांची जुळी मुलेही होती. तेजस्विनी आणि तिचा मुलगा विहान यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात लोहित जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • पीडितेच्या कुटुंबाला २० लाख मदत

बंगळुरु मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे एमडी अंजुम परवेज या अपघातात खांब कोसळल्याने एक महिला व तिच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना असून पीडितेच्या कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत दिली जाईल.

  • मुख्यमंत्री म्हणाले,

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून, ही घटना कशामुळे घडली याबाबत तपास केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा