शिमला, १४ जानेवारी २०२३ : हिमाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी पहाटे ५ वाजून १७ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टल स्केल एवढी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेपासून २२ किमी पूर्वेला भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
दरम्यान, यापूर्वी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप पहाटे १ वाजून १९ मिनीटांनी झाला होता. तर ५ जानेवारी रोजी देखील दिल्ली, आणि जम्मू – काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.