पुणे, २२ जानेवारी २०२३ : मुंबईमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून ३२५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे एक कोटी तीस लाख रुपये इतकी असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातर्फे देण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार लाख साठ हजारांची रोकडही आढळून आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
३२५ ग्रॅम हेरॉईन जप्त
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३२५ ग्रॅम हेरॉईन आढळून आले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे १ कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, आता हे अमली पदार्थ कुठून आले, आरोपी हे हेरॉईन कुठे नेणार होता, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील