श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

19

तामिळनाडू, २५ जानेवारी २०२३ अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तामिळनाडूतील इरोड येथे आज सकाळी साडेदहा वाजता खराब हवामानामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर एका खाजगी हेलिकॉप्टरने बेंगळुरूहून तिरुपूरला निघाले होते. मात्र खराब हवामानामुळे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात लँडिंग करण्यात आले. श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी चार जण प्रवास करत होते. श्री श्री रविशंकर यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. लँडिंगच्या ५० मिनिटानंतर हवामान ठीक झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.