महाड, २५ जानेवारी २०२३ : मुंबई-गोवा महामार्गावर अवैद्ध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महाड येथील राज्य उत्पादक शुक्ल विभागाने सापळा रचत पोलादपूर तालुक्यातील धामणदिवीजवळ एका स्कोडा कारची तपासणी करीत कारसह ४ लाख १८ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली.
मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा राज्यातील दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच एक स्कोडा कारवरील (एमएच- ०८, सी- ६८९७) चालक हेमंत रेडकर, सिंधुदुर्ग याच्या कारची तपासणी केली असता, या वाहनात ३५ मोठ्या बॉक्ससह काही लहान बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या दारूचे मूल्य ४ लाख १८ हजार रुपये इतके आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : दिनेश पिसाट